
नागपूर क्राईम : पोलिसांसह दोन युवकांना चाकूने भोसकले
टाकळघाट (जि. नागपूर) : येथील गांगापूर झोपडपट्टीमध्ये आपसी वादावरून झगडा सुरू असताना रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्यावर चाकूने हल्ला (Knife attack) केला व गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिस नायक व पोलिस मित्रावरसुद्धा चाकूने हल्ला करीत गंभीर जखमी केल्याची घटना बुटीबोरी एमआयडीसी पोलिस (Butibori MIDC Police) ठाण्यांतर्गत टाकळघाट येथील गांगापूर झोपडपट्टी येथे घडली. (Two youths including a policeman were stabbed Nagpur crime news)
हेही वाचा: सतत मोबाईलच्या नादात न राहता चिमुकलींन जपला छंद; दगडातून साकारल्या सुंदर कलाकृती
नितीन लोणारे (३९), वैभव लोणारे ( २७, दोघेही रा. टाकळघाट) तर पोलिस नायक प्रफुल राठोड (४३, रा. कॉलोनी शिरुळ) अशी जखमींचे नावे आहेत. मानसिंग नानाक्सिंग टाक (३५, रा. गांगापूर, टाकळघाट), नयन दत्तू कडू (२१, रा. कारला रोड, वर्धा), अतुल अंकुश निमसडे (२१, रा. आंजी वर्धा), लीलाधर धर्मदेव कुंभरे (२७, रा. वर्धा) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नानकसिंग टांक यांचे गांगापूर येथील लोकांशी जुना वाद होता. त्यामुळे त्याने साळा रवींद्रसिंग कालुलूव इतर आरोपींना वर्धेवरून बोलावून वस्तीतील लोकांसोबत वाद घालीत होते. हा वाद सुरू असताना येथील रस्त्याने नितीन लोणारे हा युवक घराकडे जात असतांना अचानक एका आरोपीने नितीनवर चाकूने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले.
घटनेची माहिती मिळताच बुटीबोरी एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस आल्याचे पाहून आरोपी दुचाक्या जागेवरच सोडून झोपडपट्टीतच लपून बसले. त्यामुळे काही पोलिस कर्मचारी त्यांना शोधण्यासाठी गेले. त्यावेळी पोलिस नायक प्रफुल राठोड यांनी आरोपीच्या दोन दुचाक्या जप्त करून पोलिस मित्राच्या मदतीने माल वाहक गाडीत टाकीत असताना जवळच लपून बसलेल्या आरोपीने दुचाकी घेऊन पळून जाण्याच्या बेताने पोलिस मित्र वैभव लोणारे याच्या पोटावर चाकू मारला.
परंतु, वैभवला आपल्यावर कुणी तरी हल्ला केल्याचे लक्षात आल्याने तो वळला असता चाकू त्याच्या मागील बाजूस घुसला. त्यामुळे तो तिथेच गंभीर जखमी झाल्याने तो विव्हळतच पोलिस नायक राठोड याला वाचविण्यासाठी ओरडला. आरोपीने राठोडवर हल्ला चढवीत त्यांना ही जखमी केले. आरडाओरड ऐकल्यामुळे घटनास्थळी इतर पोलिस कर्मचारी हजर झाल्याने आरोपी पुन्हा पळून गेला.
चार आरोपींना अटक
पोलिसांनी क्षणाचा विलंब न करता जखमी दोन युवक व पोलिस प्रफुल राठोड यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक विनोद ठाकरे यांनी शोधपथक तयार करून आरोपीच्या शोधात रवाना केले असता मध्यरात्रीपर्यंत पोलिसांनी चार आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक केली.
(Two youths including a policeman were stabbed Nagpur crime news)
Web Title: Two Youths Including A Policeman Were Stabbed Nagpur Crime
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..