धापेवाडा : वेगात असलेल्या दोन दुचाकींची जोरदार धडक होऊन दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी रात्री(ता.५) धापेवाडा येथे घडली. राजेश विनायक लोभेकर(वय २९) आणि मयूर नामदेव शेटे(वय २७) अशी मृतांची नावे आहेत. .राजेश लोभेकर, रा. तेलेपठार, ता. सौंसर (मध्यप्रदेश) आणि मयूर नामदेव शेटे(वय २७) रा. धापेवाडा, ता. कळमेश्वर हे दुचाकीने वेगाने जात होते. धापेवाडा बायपासवर नियंत्रण सुटल्याने दोन्ही दुचाकींची जबरदस्त धडक झाली. राजेश हा एमपी-२८ झेडई-७६१३ तर मयूर हा एमएच १४ एचटी ९२१४ दुचाकीवर होता. .धडकेनंतर राजेशचा जागेवर मृत्यू झाला तर मयूर गंभीर जखमी झाला. मयूरला प्राथमिक उपचारासाठी स्थानिक आरोग्य केंद्रात नेल्यानंतर पुढील उपचारासाठी नागपूर येथे आणले. पण, शुक्रवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. मयूरसोबत असलेला विक्की शेटे हा किरकोळ जखमी झाला..राजेश विनायक लोभेकर धापेवाडा येथील जिनिंग कंपनीत काम करत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांच्या रूग्णवाहिकेने मृतदेह शवविच्छेदनासाठी सावनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला. सावनेर पोलिस स्टेशनचे ठाणेदार उमेश पाटील यांनी घटनास्थळ गाठले. घटनेचा पुढील तपास जमादार सुरेंद्र वासनिक व कोकोटे करत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.