
नागपूर : पीएच.डी. करताना विद्यापीठ अनुदान आयोगाने अनेक नियम लावले आहेत. त्यात पहिला नियम म्हणजे, कुठल्याही पदव्युत्तर शाखेत ५५ टक्के पेक्षा अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांनाच पीएच.डी. करता येते. मात्र, विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेद्वारे बी.टेक. अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांना पार्टटाईम पीएच.डी.ची मुभा दिली आहे. यासाठी नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.