Nagpur Violence : अचानक कसे काय घडले? अनेकांना प्रश्‍न, राडा सुनियोजित असल्याची शंका

महाल परिसरात सोमवारी दोन समुदायातील तणावाचे रुपांतर मोठ्या राड्यात झाले. एका समुदायातील तरुणांनी दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळ केली.
nagpur violence
nagpur violencesakal
Updated on

नागपूर - महाल परिसरात सोमवारी दोन समुदायातील तणावाचे रुपांतर मोठ्या राड्यात झाले. एका समुदायातील तरुणांनी दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळ केली. मात्र, अचानक छोट्याश्‍या घटनेने रोद्र रुप धारण केल्याने अचानक कसे काय घडले? हा प्रश्‍न अनेकांना सतावत आहे. अनेकांकडून ही घटना सुनियोजित असल्याची शंका आता व्यक्त करण्यात येत आहे.

एका समुदायातील जवळपास ३० ते ३५ कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता. १८) दुपारी एक वाजता महाल झेंडा चौकात औरंगजेबाचे छायाचित्र आणि प्रतिकात्मक कबर तयार केली. औरंगजेबाच्या छायाचित्राला चपलेने मारून निषेध व्यक्त केला. दुपारी दोन वाजता त्यांनी औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरेला पेटविण्याचा प्रयत्न केला.

मात्र, त्या कबरेवर एका धर्मासाठी पवित्र मानण्यात येणारी हिरवी चादर पेटवल्याची चर्चा सोशल मिडियावरून सर्वत्र पसरली. त्यानंतर दुपारीच दुसऱ्या गटातील काहींनी गणेशपेठ पोलिसांकडे त्याबाबत तक्रार करीत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान तेव्हापासून परिसरात तणाव होता.

त्यानंतर सायंकाळची नमाज अदा होताच, दुसऱ्या समुदायातील तरुणांनी तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक करण्यास सुरुवात केली. कुणालाही त्याची अपेक्षा नसताना अचानक झालेल्या प्रकाराने पोलिसांना सावरण्याचा वेळ दिला नाही. मात्र, कमी वेळातच, पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तब्बल पाच ते सहा तासाच्या प्रयत्नानंतर पोलिसांना त्यात यश आले. मात्र, तोपर्यंत महाल, हंसापुरी परिसरातील वाहनांची जाळपोळ आणि तोडफोड युवकांनी केल्याचे दिसून आले.

युवकांकडून पेट्रोल बॉम्बचा वापर

दुसऱ्या समुदायातील युवकांनी एकीकडे दगडफेक केली तर दुसरीकडे त्यांनी जाळपोळ करण्यासाठी पेट्रोलबॉम्बचाही वापर केल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्यावर समोरून अचानक पेट्रोलबॉम्ब टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळेच तिथे असलेला जेसीबीने पेट घेतला. विशेष म्हणजे, बाजूलाच मोठे जनरेटरही होते. वेळीच आग आटोक्यात आणल्याने ते थोडक्यात बचावले.

राडा सुनियोजित नाहीच - पोलिस आयुक्त

विशिष्ट समुदायाकडून घालण्यात आलेला राडा सुनियोजित असल्याची शंका प्रत्येकजण व्यक्त करीत असताना पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी तो सुनियोजित नसल्याचे स्पष्ट केले. राड्यात बाहेरून कोणतेही युवक आले नसल्याचेही त्यांनी सांगितले.

पोलिसांनी वेळीच कारवाई केल्याने तो आटोक्यात आणण्यात पोलिसांना यश आल्याचेही ते म्हणाले. यावेळी जनतेला आवाहन करीत, त्यांनी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com