
धामणा (लिंगा) : नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील गोंडखैरीजवळील कारली शिवारात गुरुवारी (ता. १५) दुपारी एका विहीरीत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाचा तपास कळमेश्वर पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत.