नागपूर, ता. २४ ः मे आणि जून महिन्यांत जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तब्बल नऊ कोटी ६ लाखांचा फटका बसल्याची माहिती महावितरणने दिली आहे. .अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील वीज वितरण यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत ५६२ उच्चदाब आणि २ हजार ३४४ लघुदाब विद्युत खांबांचे नुकसान झाले आहे..याशिवाय ३८.३३ किलोमीटर उच्चदाब उपरी वीज वाहिन्या आणि २०५.०१ किलोमीटर लांबीच्या लघुदाब वीज वाहिन्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ४ वितरण पेट्या आणि नऊ वितरण पॉईंट्स कोसळले असून १८५ वितरण रोहित्रांना (ट्रान्सफॉर्मर) हानी पोहोचली आहे. तसेच ५ ठिकाणी सिंगल फेज वीज मीटर आणि २ उपकेंद्रांतील उपकरणांचेही नुकसान झाले आहे..Yavatmal News : पाच लाखांचे बनावट बीटी बियाणे जप्त; शेतकऱ्यांनो सावध!.एकूण १५० मीटर उच्चदाब आणि ८० मीटर लघुदाब वाहिन्यांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे महावितरणला अंदाजे ९ कोटी ६ लाखांवर फटका बसला आहे..यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. व्यवस्था सुरळीत करण्यासाठी त्यांनी पावसात आणि वादळातही न थांबता काम केले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.