
द्रुगधामना : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे नागपूर ग्रामीण तालुक्यासह परिसरात मागील आठवड्यापासून संततधार पाऊस सुरू आहे. मे महिन्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस पडल्याने शेतात पाणी साचले असून, शेतकऱ्यांची मशागतीची कामे खोळंबली आहेत.