Unseasonal Rain : विदर्भात रविवारपासून सुरू होणाऱ्या नवतपात यंदा वादळी व अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे प्रखर उन्हापासून दिलासा मिळणार असला तरी, याचा संभाव्य परिणाम पावसाळ्याच्या सुरुवातीवर होऊ शकतो.
नागपूर : भीषण गरमी व उष्ण लाटेसाठी प्रसिद्ध असलेला नवतपा रविवारपासून (ता.२६))सुरू होत आहे. मात्र हवामान विभागाने पुढील नऊ दिवस अवकाळी पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तविल्याने यंदा दरवर्षीसारखे उन्हाचे तीव्र चटके बसणार नाही.