
नागपूर : जिल्ह्यात १ ते ३१ मे या कालावधीत झालेला अवकाळी पाऊस, गारपीट व वीज कोसळल्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गारपीट व अवकाळी पावसामुळे पाच जणांचा मृत्यू झाला. ४३ वर पशूंची हानी झाली, तर सहाशेवर घरांचे नुकसान झाले आहे. १२८ हेक्टरवरील पिकांनाही फटका बसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालातून स्पष्ट झाले आहे.