Nagpur News: मराठी भाषांतर करा, आणि गुप्ताजींकडून मिळवा मोफत पपडी चाट; पाणीपुरी विक्रेत्याचा उपक्रम ठरतोय आदर्श
Chaat Challenge: पाणीपुरीवाले गुप्ताजी ग्राहकांची मराठी भाषेतील परीक्षा घेतात. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना मोफत पपडी चाट देतात. हिंदी-मराठी भाषिक सलोख्याचा संदेश देणारा नागपूरचा एक आगळा प्रयोग!
नागपूर : हिंदी विषयाच्या सक्तीवरून महाराष्ट्रात महाभारत रंगले असताना पाणीपुरीवाले उत्तरप्रदेशी गुप्ताजी मात्र पाणीपुरी आणि चाट खाण्यासाठी आलेल्या ग्राहकांची मराठीची परीक्षा घेतात. त्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना पपडी चाट मोफत दिले जाते.