

UPSC Result 2025
sakal
नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा-२०२५ चा अंतिम निकाल जाहीर झाला. या निकालात नागपूर केंद्रात प्रशिक्षण घेतलेल्या नऊ विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत केंद्रीय सेवांमध्ये स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे, या यशस्वी उमेदवारांपैकी काहींनी पुन्हा परीक्षा देत श्रेणी सुधारण्याचाही प्रयत्न केला आहे.