

Nagpur News
sakal
देवलापार : वाघोली (पिपरिया) येथे विद्युत दुरुस्तीचे काम करत असताना पोलवरून खाली पडल्याने कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. सेवकराम कोटीराम मलघाम (वय ३२, रा. डोंगरताल) असे मृत कामगाराचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावात शोककळा पसरली आहे.