Vande Bharat Sleeper: मुंबई-नागपूर वंदे भारत स्लीपर कधी धावणार? मुंबई-बंगळुरूला मिळाली हिरवा झेंडा ;उपराजधानीची उपेक्षाच

Vande Bharat Sleeper, Mumbai Nagpur Train, Central Railway : मुंबई-बंगळुरूनंतर आता मुंबई-नागपूर मार्गावरही वंदे भारत स्लीपर सुरू करण्याची मागणी होत आहे. प्रवाशांची वाढती गर्दी, आरक्षणातील अडचणी आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी स्लीपर गाडीची गरज प्रवासी संघटनांनी मांडली आहे.
Passengers seek a Vande Bharat Sleeper service on the busy Mumbai-Nagpur railway route.

Passengers seek a Vande Bharat Sleeper service on the busy Mumbai-Nagpur railway route.

esakal

Updated on: 

अखिलेश गणवीर

नागपूर : भारतीय रेल्वेत अत्याधुनिक सुविधायुक्त वंदे भारत स्लीपर गाडी दाखल झाली आहे. मुंबई-बंगळुरूला हिरवी झेंडी मिळाली असून रविवारी उद्‍घाटनानंतर ती नियमितही झाली आहे. मात्र, राज्याच्या राजधानी ते उपराजधानी अशा मध्य रेल्वेच्या वर्दळीच्या मार्गावर वंदे भारत स्लीपरची केवळ प्रतीक्षाच आहे.

गाडी क्रमांक २७५७५/२७५७६ हावडा-कामाख्या-हावडा स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसनंतर मुंबई-बंगळुरू-मुंबई (२७६५१/२७६५२) ही देशातील दुसरी स्लीपर वंदे भारत रेल्वे ठरली आहे. मुंबई ते नागपूर प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रोज धावणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेस, दुरांतो आणि सेवाग्राम या गाड्या दोन्ही ठिकाणाहून नेहमीच हाऊसफूल धावतात.

Loading content, please wait...