‘सकाळ’च्या ‘वसा गोसमृद्धीचा’ अभियानाचे आज उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vasu Baras 2022

‘सकाळ’च्या ‘वसा गोसमृद्धीचा’ अभियानाचे आज उद्‍घाटन

नागपूर : विदर्भातील ११ जिल्ह्यांतील १२० तालुक्यांत ठिकठिकाणी शुक्रवारी वसुबारसच्या निमित्ताने गाय आणि वासराच्या पूजनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. ‘सकाळ’च्या ‘वसा गोसमृद्धीचा, ’ या नव्या अभियानाची सुरुवातही यातून जंगी स्वरूपात होणार आहे.

गाईचे महत्त्व आध्यात्मिकसोबत वैज्ञानिकही खूप जास्त आहे. वाघ आणि जंगल वाचविण्यावर जेवढा भर देण्यात येतो, तेवढाचा नव्हे तर त्याहून जास्त भर गाय वाचविण्यावर द्यावा, असे मत तज्ज्ञ अभ्यासक प्रवीण मोटे यांनी व्यक्त केले. गाय हा जैवसमृद्धीतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि तो प्रत्येकाच्या जीवनाशी अधिक घट्ट निगडित आहे, हे या अभियानातून समजून घेणे शक्य आहे, असे मत मोटे यांनी व्यक्त केले.

वसुबारसच्या निमित्ताने गाय आणि वासराची पूजा करण्याची भारतीय परंपरा आहे. ही परंपरा केवळ पूजेपुरती मर्यादित न ठेवता प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठी आणि प्रत्येकाचाच त्यातील सहभाग वाढविण्यासाठी ‘सकाळ’ने ‘वसा गोसमृद्धीचा, वारसा गोसमृद्धीचा’ या अभियानाची संकल्पना मांडली आहे.

माफसूत उद्‍घाटनाचा मुख्य कार्यक्रम

‘सकाळ’च्या ‘वसा गोसमृद्धीचा’ अभियानाच्या उद्‍घाटनाचा मुख्य कार्यक्रम महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठात आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. आशिष पातुरकर राहतील. ‘सकाळ’च्या अभियानातील सहयोगी संस्था ‘सेंटर फाॅर पिपल्स कनेक्टिव्ह’चे प्रमुख सजल कुलकर्णी आणि ‘गौळाऊ गोवंश जतन, संवर्धन, संशोधन व पैदासकार चॅरिटेबल ट्रस्ट’चे पुष्पराज कालोकार यांच्यासह तज्ज्ञ अभ्यासक प्रवीण मोटे यांचीही उपस्थिती राहणार आहे.