
चेतन बेले
नागपूर : काही वर्षांपासून सातत्याने पारंपारिक शेतीत नुकसान, बियाणे खतांची वाढती महागाई अन् पडलेले शेतमालाचे भाव तसेच कमी उत्पादन आदींमुळे शेती तोट्याचा व्यवसाय झाली आहे. या पारंपारिक शेतीला रेशीम शेती पर्याय ठरत असून पूर्व विदर्भात १०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी वर्षाकाठी लाख रुपयांचे उत्पन्न घेत उन्नतीचा मार्ग साधला आहे. परिणामी यंदा १ हजार २५ एकरावर पूर्व विदर्भात रेशीम शेती होणार आहे.