

Nagpur News
esakal
नागपूर: विदर्भात उन्हाचा कहर सुरूच असून, रविवारी पुन्हा कमाल तापमानात वाढ झाली आहे. नागपूरच्या पाऱ्याने या मोसमातील उच्चांकी ४४.४ अंशांपर्यंत झेप घेतली. तर अकोला आणि वर्ध्याचे तापमान ४५ अंशांवर पोहोचले आहे. सोमवारपासून ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असल्यामुळे वैदर्भीयांना दोन-तीन दिवस उन्हाच्या चटक्यांपासून दिलासा मिळण्याचा अंदाज आहे.