
नागपूर : मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच आता नागपूर जिल्ह्यासह विदर्भातून ते आपल्या मंत्रिमंडळात कोणाला संधी देणार याची चर्चा रंगली आहे. यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार यांचे नाव आघाडीवर आहे.