

Nagpur
esakal
नागपूर: विदर्भात एरव्ही मॉन्सून १५ जूनच्या आसपास येतो. यंदा मात्र एल-निनोच्या प्रभावामुळे मॉन्सूनला चांगलाच उशीर होत आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, यंदा २५ जूननंतरच मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. हे खरे ठरल्यास तब्बल पंधरा वर्षांनंतर प्रथमच मॉन्सूनचे उशिरा आगमन होणार आहे.