
नागपूर : कोणी सरकारला निकम्मा म्हणतो, कोणी भिकारी म्हणत सरकारवर टीका करत आहेत. देश कोणत्या पातळीवर आहे, याची वास्तविकता आता समोर येत आहे. राज्य सरकारला साडेसाती लागली आहे, सरकारमधील मंडळीच खरी परिस्थिती समोर आणत असतील तर त्यांचे आभार मानले पाहिजे, अशी टीका करीत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले.