

नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासमधील (आरएल) घोटाळा व नागरिकांच्या अनधिकृत घरांबाबत होणाऱ्या अन्यायाचा मुद्दा आज विकास ठाकरे यांनी विधानसभेत उपस्थित केला. एनआयटीकडून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करत मोकळ्या जागांवर बिल्डरचे पाच अनधिकृत प्लॉट्स नियमित करण्यात आले. पण सामान्य नागरिकांचे वर्षानुवर्षे राहते घर व प्लॉट्स मात्र नियमित करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.