esakal | विमला आर. नागपूरच्या नव्या जिल्हाधिकारी; ठाकरेंना अद्याप नियुक्ती नाही
sakal

बोलून बातमी शोधा

विमला आर. नागपूरच्या नव्या जिल्हाधिकारी; ठाकरेंना नियुक्ती नाही

विमला आर. नागपूरच्या नव्या जिल्हाधिकारी; ठाकरेंना नियुक्ती नाही

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : शासनाने आज अनेक सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या (Transfers of Chartered Officers) केल्या. नागपुरातील तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे (Transfer of Collector Ravindra Thackeray), महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, आदिवासी विभागाच्या अतिरिक्त आयुक्त मनीषा खत्री यांचा समावेश आहे. (Vimala-R.-New-Collector-of-Nagpur)

नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून विमला आर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या शनिवारी पदभार स्वीकारणार आहेत. मात्र, मावळते जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना अद्याप नियुक्ती देण्यात आली नाही. ठाकरे यांनी ७ सप्टेंबर २०१९ ला जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला होता. जवळपास पावणे दोन वर्षे ते नागपूरमध्ये कार्यरत होते. विमला आर. या महसूल संवर्गातून सनदी अधिकारी झाल्या आहेत.

हेही वाचा: निवडणूक स्थगित, रद्द नाही; ओबीसींना आरक्षण नाहीच

नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांना पदोन्नती देण्यात आली असून ते आता धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होतील. आदिवासी विभागाच्या अतिरिक्त आयुक्त मनीषा खत्री यांना नंदुरबारचे जिल्हाधिकारी करण्यात आले आहेत. खत्री व शर्मा यांच्या जागी कुणाचीही नियुक्ती करण्यात आली नाही.

(Vimala-R.-New-Collector-of-Nagpur)

loading image