Yogi Adityanath: "मतदान करा अन् अयोध्या दर्शनासाठी या", गडकरींच्या प्रचारात योगी आदित्यनाथ यांचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामुळेच अयोध्येत राम मंदिराची उभारणी झाली. आता नितीन गडकरी यांना मतदान करा आणि अयोध्येला दर्शनासाठी या, असे आवाहन नागपूरच्या जनतेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.
vote to nitin gadkari and visit ayodhya for lord ram darshan lok sabha election
vote to nitin gadkari and visit ayodhya for lord ram darshan lok sabha election Sakal

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामुळेच अयोध्येत राम मंदिराची उभारणी झाली. आता नितीन गडकरी यांना मतदान करा आणि अयोध्येला दर्शनासाठी या, असे आवाहन नागपूरच्या जनतेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.

नितीन गडकरी यांच्या प्रचारार्थ फ्रेंड्‍स कॉलनी येथे सोमवारी झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. मी मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या भूमीतून आलोय. आमच्याकडे होळीच्या उत्सवात अनेक वर्षे होली खेले रघुविरा’ हे गाणे वाजवले जायचे. पण आज पाचशे वर्षांनी रामलला खऱ्या अर्थाने होळी खेळले. काँग्रेस सत्तेत असती तर हे शक्य झाले नसते, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

योगी म्हणाले, गडकरी यांनी नागपूरसह संपूर्ण देशात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या. पायाभूत सुविधांच्या बाबतीत भारताची चर्चा जगभरात होत आहे. आज देशाने गेल्या दहा वर्षांमध्ये जी प्रगती केली आहे, त्यात गडकरी यांचे योगदान मोठे आहे.

मुख्यमंत्री योगी म्हणाले, ‘देशाला ऊर्जा देणाऱ्या भूमिमध्ये आज संवाद साधण्याची संधी मला मिळत आहे, हे माझे भाग्य आहे. याच शहरातील महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी हे राष्ट्रीय राजकारणातील अजातशत्रू म्हणून ओळखले जातात.

महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशसह संपूर्ण देशात त्यांनी पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण केले. आज नागपूरचे इन्फ्रास्ट्रक्चर बघून तर मी प्रभावित झालो. त्यांच्या शब्दकोशात ‘नाही’ हा शब्दच नसतो.

आम्ही उत्तर प्रदेशच्या विकासकामांसाठी जेव्हा जेव्हा निधी मागितला तेव्हा तेव्हा त्यांनी होकार दिला आणि त्याची प्रचीती तुम्हाला उत्तर प्रदेशचे बदललेले चित्र बघून येईल.

अशा नेत्याला पुन्हा एकदा निवडून देण्याची संधी नागपूरकरांना मिळत आहे. ‘अब की बार चारसौ पार’साठी गडकरींना पाच लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहनही योगी आदित्यनाथ यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com