मनपा निवडणुकीच्या प्रतीक्षेने वाढतेय अस्वस्थता! नेते अन् कार्यकर्त्यांमध्ये होतोय दुरावा

Elecation
Elecation

नागपूर : महापालिका निवडणूक कधी होणार, हा एकच प्रश्न सध्या चर्चेत असून दिवसेंदिवस प्रतीक्षेचा काळ आणखी वाढत असल्याने आता कार्यकर्त्यांमध्येही अस्वस्थता दिसून येत आहे. निवडणूकच नसल्याने माजी नगरसेवकांकडून कार्यकर्त्यांवर होणाऱ्या खर्चालाही आळा घातला गेला आहे. परिणामी दुरावत असलेले कार्यकर्ते पुन्हा कसे जोडायचे, असा प्रश्नही माजी नगरसेवकांना पडला आहे.

Elecation
Metro : मेट्रो रेल्वेचा भार ग्रामीण जनतेवर; आता 'या' व्यवहारांवर एक टक्के अधिभार

महापालिकेवर सव्वा वर्षापूर्वी प्रशासक नियुक्ती केल्यानंतर काही माजी नगरसेवकांनी लवकरच निवडणूक होतील, या अपेक्षेने जनसेवक, कार्यसेवक म्हणून लोकांची कामे करणे सुरू केले होते. त्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी फौज त्यांच्याकडे होती. परंतु महापालिका निवडणूक जवळपास दिसत नसल्याने अनेक नगरसेवकांनी कार्यकर्त्यांवर होणाऱ्या खर्चावर मर्यादा आणल्या. काही माजी नगरसेवकांकडून कार्यकर्त्यांना कामेही दिली जात होती. आता नगरसेवकपदी नसल्याने त्यांना कामेही देणे शक्य होत नाही.

Elecation
Train Berth : लोअर बर्थ आता दिव्यांगांसाठी राहणार राखीव, पण...

नगरसेवकांकडून मिळणारी रसद शिवाय कामेही मिळत नसल्याने भाजपच नव्हे तर कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्येही नाराजीचा सूर आहे. परंतु यासाठी कार्यकर्ते माजी नगरसेवकांना दोष देत नसल्याचेही दिसून येत आहे. राज्यात सत्ता असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडून दबक्या आवाजात आता राज्य सरकारच्या निर्णयाची चौकांत, टपरीवर समीक्षा होत आहे. यातून राज्य सरकारवर नाराजीचा सूर स्पष्ट दिसत आहे.

महापालिकेत सत्ता असताना या कार्यकर्त्यांना नगरसेवकांकडून विविध कामे दिली जात होती. कुणी प्रभागात कामे करत होते तर कुणी नगरसेवकांच्या कार्यलयात येणाऱ्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी महापालिका, झोन कार्यालयाशी समन्वय साधणारे होते. अर्थात यासाठी त्यांच्यावर नगरसेवकांकडून खर्च केला जात होता. काही जणांना वेतनही दिले जात होते. परंतु प्रशासक नियुक्तीनंतर काही काळातच माजी नगरसेवकच नव्हे तर कार्यकर्त्यांचे चेहरेही निस्तेज झाले.

महापालिका निवडणुकीच्या प्रतीक्षेत अजूनही त्यांचे चेहरे निस्तेजच दिसून येत आहे. विशेष म्हणजे माजी नगरसेवकांचे कार्यकर्ते त्यांच्यापासून दुरावले. सत्ताधारी भाजप असो की कॉँग्रेस किंवा इतर पक्ष, सर्वांचीच स्थिती सारखीच आहे. भाजपमध्येही कार्यकर्ते रोष व्यक्त करीत आहे. मनपा निवडणूक कधी होईल, या प्रतीक्षेत कार्यकर्त्यांमध्येच नव्हे तर माजी नगरसेवकांतही अस्वस्थता आहे.

भाजप बदलणार ८० टक्के चेहरे?

मागील सत्तेतील अनेक नगरसेवकांची कामे समाधानकारक नसल्याचे समजते. भाजप ८० टक्के चेहरे बदलणार असल्याची चर्चा पक्षातच रंगली आहे. त्यामुळे अनेक माजी नगरसेवकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. एकीकडे निवडणुकीची प्रतीक्षा आणि दुसरीकडे पक्षातील चर्चेने माजी नगरसेवकांची झोप उडाल्याचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com