Tragic Warud Road Accident
esakal
वरूड (जि. अमरावती) : वरूड तालुक्यातील राजुराबाजार ते वरूड मार्गावरील रेल्वेक्रॉसिंगजवळ शिवाई बस व प्रवासी ऑटोच्या भीषण अपघातात ऑटोतील पाच जण ठार झाले, तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता. १८) सकाळी पावणेअकराच्या सुमारास घडली. शिवाई बसची धडक एवढी जोरदार होती की, धडकेनंतर ऑटोतील प्रवासी दूरवर फेकले गेले. त्यात ऑटोचेही छप्पर उडाले.