Crime News: बदनामीच्या भीतीतून बापानेच घेतला मुलीचा जीव; सहा दिवसानंतर घटनेचे बिंग फुटले

Father Accused in Daughter's Death in Washim : वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे समाजात बदनामी होत असल्याच्या रागातून पित्याने ३५ वर्षीय विवाहित मुलीचा शेल्याने गळा आवळून मृत्यू घडविल्याचा आरोप आहे.
Police investigate a case in Brahmanwada after a mother accused her husband in their daughter’s death.

Police investigate a case in Brahmanwada after a mother accused her husband in their daughter’s death.

esakal

Updated on: 

शिरपूर (जि. वाशीम) : समाजात बदनामी होत असल्याच्या कारणावरून पित्यानेच स्वतःच्या ३५ वर्षीय विवाहित मुलीचा शेल्याने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना मालेगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे मंगळवारी (ता. २०) घडली. घटनेनंतर तब्बल सहा दिवसांनी अर्थात सोमवारी (ता.२६) या प्रकरणाचे बिंग फुटले असून, मृत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी पित्याविरुद्ध मालेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com