
वाशीम : प्रशासकीय यंत्रणा ही शासकीय कामे नियम व कायद्याच्या चौकटीत करून घेण्यासाठी निर्माण झालेले माध्यम आहे. मात्र, जिल्ह्यात ही प्रशासकीय यंत्रणाच सुस्त झाली की, आपले आपणच मालक या गुर्मीत या यंत्रणेला सत्तेची मस्ती चढली, असा प्रश्न निर्माण करणाऱ्या घटना दररोज समोर येत आहेत.