Nagpur : जागेअभावी जलकुंभ रखडले

१०० कोटींचा भुर्दंड; चुकीचा डीपीआर ; प्रशासनाकडूनच कबुली
nagpur
nagpursakal

नागपूर: अमृत योजनेतंर्गत महापालिका शहरात १६ जलकुंभ बांधणार आहे. परंतु, ११ जलकुंभासाठी जागा उपलब्ध न झाल्याने बांधकाम रखडले आहे. त्यामुळे मनपावर १०० कोटी अधिकचा भुर्दंड बसणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे आज मनपा सभागृहात देण्यात आली.

मनपाच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांनी प्रश्नोत्तरांच्या तासात हा विषय उपस्थित केला होता. जलकुंभाचा डिपीआर चुकीचा बनविण्यात आला. ११ जागेचे भूसंपादन झाले नाही. त्यामुळे जलकुंभाचे काम रखडले, असे प्रशासनातर्फे कार्यकारी अभियंता श्वेता बनर्जी यांनी सांगितले. यावेळी विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांनी महानगर पालिकेत प्रशासनाच्या मर्जीतील अधिकारी, कर्मचारी वर्षानूवर्षे एकाच जागी कार्यरत असल्याचा आरोप केला. बदलीसंदर्भात मनपाचे काय धोरण आहे, असा प्रश्न विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी उपस्थित केला.

हा विषय माजी स्थायी समिती सभापती विजय झलके यांनी उचलून धरला. त्यावर उत्तर देताना उपायुक्त निर्भय जैन म्हणाले, बदली कायद्यांतर्गत बदलीचे अधिकार मनपा आयुक्तांना आहेत. याशिवाय बदलीत मुदतवाढीचेही अधिकार त्यांनाच आहेत. प्रशासकीय सोयीनुसार काही अधिकारी, कर्मचाऱ्यांना ३ वर्षे उलटूनही त्याच जागेवर कार्यरत आहेत. वर्ग १ व २ च्या अधिकाऱ्यांना बदलीसाठी ३ वर्षांची अट आहे. वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांना ५ वर्षांची तर वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांसाठी ७ वर्षाची अट आहे, असे ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com