
नागपूर : आधुनिक काळात हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज आकाशात भले मोठे फुगे (बलून) सोडले जातात, हे वाचून अनेकांना नवल वाटेल. पण, हे खरे आहे. प्रादेशिक हवामान विभागाकडून दररोज दोनवेळा फुगे सोडून हवामानाचा अंदाज घेतला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून हवामानाचा अंदाज घेण्यासाठी हवामान विभागाकडून हा अनोखा प्रयोग केला जात आहे. साधारणपणे १९६७ पासून नागपूर प्रादेशिक हवामान केंद्रात हा प्रयोग सुरू आहे.