लॉकडाउनबाबत आयुक्त मुंढेंपुढे सर्वपक्षीय कोणती भूमिका मांडणार ? वाचा

What role will all parties play in front of the Commissioner regarding lockdown?
What role will all parties play in front of the Commissioner regarding lockdown?
Updated on

नागपूर : शहरात लॉकडाउन नकोच, या भूमिकेवर सर्वपक्षीय ठाम असून उद्या "जनता कर्फ्यू'नंतरच्या शहरातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक होणार आहे. या बैठकीत पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घोषित केलेल्या समितीतील अधिकारीही उपस्थित राहणार आहे. त्यांच्यापुढे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी लॉकडाउनबाबत भूमिका स्पष्ट करणार आहे. एकप्रकारे या बैठकीत लॉकडाउनचे भवितव्य ठरणार आहे. 

मागील 24 जुलैला महापौर संदीप जोशी आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संयुक्तपणे "जनता कर्फ्यू'ची घोषणा केली होती. 25 आणि 26 जुलैला शहरात लावण्यात आलेल्या "जनता कर्फ्यू'ला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर चार दिवस सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींकडून जनतेत जनजागृतीचा कार्यक्रमही तयार करण्यात आला होता.

विशेष म्हणजे जनजागृतीतून लॉकडाउन लावण्याची वेळ येऊ नये, यासाठी नियम पाळण्याबाबत लोकप्रतिनिधी नागरिकांची समजूत काढणार होते. परंतु पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पत्रकारपरिषद घेऊन "स्मार्ट लॉकडाउन'ची शक्‍यता व्यक्त केली. त्यामुळे पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी पालकमंत्र्यांचा निषेध व्यक्त करीत जनजागृती कार्यक्रमही रद्द केला.

परिणामी उद्या, 31 जुलैला आढावा होणार की नाही? याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु महापौर जोशी यांनी ही बैठक होणार असल्याचे स्पष्ट केले. सत्ताधाऱ्यांसह कॉंग्रेसमधील काही लोकप्रतिनिधी व बसपाचा लॉकडाउनला विरोध आहे. पालकमंत्री राऊत यांनी यासंदर्भात अधिकाऱ्यांची एक समिती तयार केली आहे.

या समितीत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचाही समावेश आहे. उद्या, होणाऱ्या बैठकीत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींसह आयुक्त तुकाराम मुंढे, अतिरिक्त पोलिस आयुक्त नीलेश भरणे आदीही उपस्थित राहणार आहेत. सत्ताधारी व इतर पक्षाच्या लोकप्रतिनिधींचा लॉकडाउनला विरोध असल्याने ही बैठक वादळी ठरण्याची शक्‍यता आहे. 

लॉकडाउनला विरोधच : महापौर 
उद्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी तसेच मनपा आयुक्त, अतिरिक्त पोलिस आयुक्त बैठकीत उपस्थित राहतील. पालकमत्र्यांनी घोषित केलेल्या समितीतील आयुक्तही बैठकीत राहणार असल्याने त्यांच्यापुढे भूमिका मांडणार आहे. लॉकडाउनला सर्वांचाच विरोध आहे. हीच भूमिका उद्या स्पष्ट करण्यात येईल, असे महापौर संदीप जोशी यांनी नमुद केले. 

अफवांवर विश्‍वास ठेऊ नका : मुंढे 
शहरात 31 जुलै अथवा 3 ऑगस्टपासून पुन्हा कडक लॉकडाउन सुरू होईल, याबाबतचे वृत्त निव्वळ अफवा आहे. शहरात लॉकडाउन घोषित करण्याचा अधिकार महानगरपालिका आयुक्तांना आहे. आयुक्तांव्यतिरिक्त कुणाच्याही नावाने संदेश असेल तर ती केवळ अफवा आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com