नापास नगरसेवकांचे काय करायचे?

भारतीय जनता पक्षाला सतावतेय चिंता : अनेकांना घरी बसवणार
Nagpur Municipal Corporation
Nagpur Municipal Corporationsakal

नागपूर - वर्षभरापासून निवडणुकीच्या मोडवर असलेल्या भाजपला सर्व्हेत नापास झालेल्या नगरसेवकांची नाराजी दूर करण्याची मोठी कसरत करावी लागणार आहे. पक्षातर्फे दोन सर्वे करण्यात आले असून यात सुमारे तीस टक्के नगरसेवकांना घरी बसवावे लागणार आहे. ते निवडणुकीच्या काळात उपद्रवी ठरणार नाहीत याची खबरदारी घेण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर आहे.

भाजपने यावेळी महापालिकेत १२० प्लसचे टार्गेट ठेवले आहे. त्याकरिता वर्षभरापासून मेळावे, संवाद सभा, शक्ती बुथ, बैठकांचा कार्यक्रम सातत्याने सुरू आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचा वाढदिवस साजरा करतानासुद्धा निवडणुकीच्या अजेंड समोर ठेवूनच कार्यक्रमांची आखणी करण्यात आली होती. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांना यात सहभागी करून घेतले.

वयोश्री योजनेतूनही ज्येष्ठ नागरिकांची सहानुभूती मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हे सर्व करीत असताना पाच वर्षे निष्क्रिय राहिलेल्या आणि त्यामुळे पक्षाची प्रतिमा खराब झालेल्या नगरसेवकांमुळे पक्षाला धक्का बसू शकतो. याची जाणीव पक्षालासुद्धा आहे. अनेक नेत्यांनी पक्षांतर्गत बैठकांमध्ये ही नाराजी बोलूनसुद्धा दाखवली आहे. त्यामुळे निष्क्रिय नगरसेवकांचे तिकीट कापण्याशिवाय भाजपसमोर दुसरा पर्याय दिसत नाही. महापालिकेच्या निवडणुकीनंतर लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्ता गमावणे भाजपला परवडणारे नाही.

नितीन गडकरींचा शब्द अंतिम

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी या निवडणुकीत सक्रिय राहणार आहेत. पक्षासोबतच त्यांच्यामार्फत एक स्वतंत्र सर्व्हे केला जाणार आहे. यात कोण नापास होतो आणि उत्तीर्ण हे महत्त्वाचे ठरणार आहे. गडकरी यांचे धक्कातंत्र सर्वांना ठाऊक आहे. त्यांचा शब्द अंतिम असतो. त्यानंतर त्यात कोणी हस्तक्षेप करीत नाही. मागील निवडणुकीच्यावेळी महाल प्रभागात शेवटच्याक्षणी मोठी उलथापालथ झाली होती. त्यामुळे अनेक नगरसेवक आणि इच्छुक उमेदवार धास्तावले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com