Padma Awards 2024 : ‘सेव’चा डॉक्टर झाला गरिबांचा देव, डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

चंद्रशेखर मेश्राम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर
Padma Awards 2024 : ‘सेव’चा डॉक्टर झाला गरिबांचा देव, डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

मूळचे उमरेड तालुक्यातील सेव या लहानशा खेड्यातून थेट जगाच्या नकाशावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे प्रसिद्ध मेंदू रोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री हा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आला. ही नागपूरसह देशातील वैद्यकीय क्षेत्रासाठी भूषणावह बाब ठरली आहे. मेंदू विकारावरावरील जनजागृतीसाठी त्यांना हा पुरस्कार घोषित झाला.

डॉ. मेश्राम गत ३० वर्षापासून मेंदू विकारावर वैद्यकीय सेवा देत आहेत. त्यांनी नागपूरच्याच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालायातून (मेडिकल) एमबीबीएस व एमडी केल्यानंतर विदेशातून शिक्षण घेतले. भारतात परतून त्यांनी वैद्यकीय सेवा सुरू केली. देशातील आघाडीचे मेंदूविकार तज्ज्ञ असा त्यांचा लौकिक आहे. रुग्णांवर उपचारासोबतच मेंदूरोगासंदर्भात जनजागृतीतही ते कायमच आघाडीवर असतात.

प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम सद्या वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी (डब्ल्यूएफएन) चे विश्वस्त आहेत. संघटनेचे जगभरात रशिया , युरोप आणि भारत, तीनच देश विश्वस्त असून डॉ. मेश्राम भारतचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

पक्षघात, अपसमार, मिरगी अशा मेदूरोग विकारावर जनजागृती संदर्भातील त्यांच्या कार्याचा आवाका जगातील १२४ देशांपर्यंत विस्तारला आहे. त्यांचे भाऊ डॉ. सुरेश मेश्राम हे मुंबईला महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून निवृत्त झाले. तर डॉ. शिरीष मेश्राम उमरेड येथे वैद्यकीय सेवा देत आहेत.

पद्मश्री पुरस्कार घोषित झाल्याचा मनापासून आनंद आहे. वैद्यकीय सेवेचा घेतलेला वसा मी हयात असेपर्यंत असाच सुरूच राहील. या पुरस्काराने रुग्णसेवेचे बळ आणखी वाढले आहे.

- डॉ. चंद्रशेखर मेश्राम, प्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ आणि विश्वस्त, वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com