
नागपूरमध्ये अलीकडेच उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी 51 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचे (MDP) नागपूर अध्यक्ष फहीम शेख खान यांचे नाव समोर आले असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनानंतर मुस्लिम संघटनांनी निषेधार्थ आंदोलन केले. सोमवारी दुपारी ३८ वर्षीय फहीम शेख खान यांनी 50 ते 60 जणांना एकत्र करून पोलीस स्टेशनसमोर निवेदन दिले होते. त्यानंतर या आंदोलनाचा तणाव वाढला आणि हिंसाचार सुरू झाला.