esakal | नितीन गडकरी यांचा इशारा कोणाला? गटबाजी फोफावल्याचे केले मान्य
sakal

बोलून बातमी शोधा

Whom did Nitin Gadkari warn Admittedly factionalism has spread Nagpur political news

राज्यात पाच वर्षे भाजपची सत्ता होती. नागपूरचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. नागपूरला मोठा निधीही त्यांनी उपलब्ध करून दिला. त्यामुळे भाजपचे मताधिक्य वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

नितीन गडकरी यांचा इशारा कोणाला? गटबाजी फोफावल्याचे केले मान्य

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : भाजपचे नेते तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच आपल्या भाषणात गटबाजी करू नका, असे आवाहन केल्याने भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी फोफावल्याचे स्पष्ट होते. स्थापना दिनाचे औचित्य साधून त्यांनी नेत्यांचे कान टोचले. त्यांचा इशारा नेमका कोणाकडे, याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत.

भाजपला आता महापालिकेच्या निवडणुकीची चिंता सतावत आहे. राज्यात सत्ता नाही. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद आणि विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचा धक्कादायक पराभव झाला. तीन पक्षांची महाविकासआघाडी अस्तित्वात आली आहे. भाजपच्या विरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाल्याचे दिसत आहे. यात अंतर्गत गटबाजी भाजपला चांगलीच महागात पडू शकते.

जाणून घ्या - पालकमंत्री बच्चू कडू यांनी लगावली स्वयंपाकीच्या कानशिलात

राज्यात पाच वर्षे भाजपची सत्ता होती. नागपूरचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. नागपूरला मोठा निधीही त्यांनी उपलब्ध करून दिला. त्यामुळे भाजपचे मताधिक्य वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. झाले उलटेच. शहरातील भाजपचे तीन आमदार पराभूत झाले. फडणवीस यांना अपेक्षित मताधिक्याचा आकडाही गाठता आला नाही. दक्षिण आणि मध्य नागपूरचे भाजपचे उमेदवार थोडक्यात बचावले. सर्व करूनही मताधिक्य घटल्याने भाजपचे नेते चिंतेत आहेत.

भाजपला आता गटबाजीची चिंता

शहरातील नगरसेवकांच्या निष्क्रियतेचाही फटका भाजपला बसल्याचे दिसून येते. चारच प्रभाग असल्याने एक किंवा दोन नगरसेवकच पुढाकार घेऊन चार वर्षांपासून काम करीत आहेत. उर्वरित नगरसेवकांनी संबंध ठेवला नाही. तसेच कामही केले नाही. त्यामुळे भाजपच्या विरोधात मोठा असंतोष आहे. यात भाजपला आता गटबाजीची चिंता सतावत आहे.

अधिक वाचा - Flat Foot : पाय सपाट असेल तर त्वरित करा उपचार; दुर्लक्ष कराल तर होईल नुकसान

गडकरी बोलले त्यात तथ्य

कोणी कितीही नाही म्हटले तरी भाजपमध्ये गटतट आणि गटबाजी निर्माण झाली आहेच. महापालिकेतील नियुक्त्यांवरून ते दिसून येते. अलीकडे ती जरा जास्तच वाढली आहे. त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. कोणी उघडपणे नाही तरी खासगीत बोलत आहेत. गडकरी बोलले त्यात तथ्य असल्याचे एका भाजपच्या कार्यकर्त्याने सांगितले. 

loading image
go to top