.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. परमबीर सिंग जे बोलले ते खरे आहे. माझ्या अटकेसाठी महाविकास आघाडी सरकारने काही अधिकाऱ्यांना सुपारी दिली होती.
आम्ही त्याचा पर्दाफाश करू शकलो, अशी देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी प्रतिक्रिया दिली होती. यावरून आता अनिल देशमुख यांनी पुन्हा फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यासंदर्भात अनिल देशमुख यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.