२० दिवसांच्या अंतरानं पती-पत्नीचा मृत्यू, दोन्ही मुले झाली पोरकी

death
deathdeath
Updated on

वाडी (जि. नागपूर) : कोरोनाच्या या महामारीच्या (corona pandemic) संकटात देशाला व समाजाला विविध दुःखाला सामोरे जावे लागत आहे. याचा फटका अनेक स्थिर व सुखी असलेल्या कुटुंबीयांना बसल्याचे दिसून येत आहे. असाच एक दुःखद प्रसंग वाडीतील धम्म कीर्तीनगर येथील हरडे परिवारासोबत घडला. वीस दिवसांच्या अंतराने आई-वडील या दोघांचाही मृत्यू झाल्याने त्यांच्या दोन्ही मुलावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याबद्दल परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (wife and husband died due to corona in wadi of nagpur)

death
औषधांसह सकारात्मकताच गुणकारी; बेदरकर कुटुंबाची कोरोनावर मात

सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, धम्मकीर्तीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते व आयुध निर्माणी अंबाझरी येथून सेवानिवृत्त झालेले पुंडलिक हरडे (वय६६) यांना कोरोना आजाराच्या त्रासामुळे 3० एप्रिलला नागपुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान राजीव गांधी प्राथमिक शाळा, नवनीत नगर येथून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षिका पत्नी आशा हरडे (वय६३) यांनाही संसर्ग झाल्याने दुसऱ्याच दिवशी वानाडोंगरी स्थित मेघे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तीन मे रोजी उपचारादरम्यान आशा हरडे यांचे निधन झाले. हा आघात घरी असलेले त्यांची दोन्ही अभियंता व उच्च शिक्षित मुले निखिल व तुषार यांना बसला. नियमाप्रमाणे त्यांचा अंतिम संस्कार प्रशासनातर्फे मृतदेह घरी न आणता अंबाझरी घाटावर करण्यात आला. वीस दिवसांच्या उपचारानंतरही पुंडलिक हरडे यांनी उपचाराला प्रतिसाद न दिल्याने २३ मे रोजी जगाचा निरोप घेतला.

परिसरातील सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र मेंढे, नाशिक शामकुवर, राजेंद्र कांबळे, अशोक वासेकर, ज्ञानेश्वर गोलाईत, सुनील पाटील, विश्वास वानखेडे, माणिक खोब्रागडे आदींनी धाव घेऊन मुलांचे सांत्वन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com