esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

galfas.

लग्नानंतर पूर्वाश्रमीची प्रेयसी परतली अन् गेला पत्नीचा जीव

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : पहिले प्रेम विसरले जात नाही, असे म्हणतात. पहिल्या प्रेमाची ओढ एवढी असते की त्यापुढे आपला संसार किंवा नात्यालाही दूर सारले जाते. असाच काहीसा प्रकार इमामवाड्यात घडला. दोन मुलांचा बाप असलेल्या युवकाचे पहिले प्रेम पुन्हा उफाळून आले. त्याची कुणकुण बायकोला लागली. वाद वाढत गेल्याने पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. अमृता (२७, रा. रामबाग) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

इमामवाडा ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोचन आणि अमृताचे जवळपास सहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना दोन मुले आहेत. तोपर्यंत दोघांचाही संसार सुरळीत सुरू होता. काही दिवसांपूर्वी लोचनच्या आयुष्यात पूर्वाश्रमीची प्रेयसी परतली. दोघांची पुन्हा मने जुळली. दोघांच्या भेटी व्हायला लागल्या. दोघांचे पुन्हा प्रेम उफाळून आले. त्याची कुणकुण पत्नी अमृताला लागली.

तिने पतीच्या मोबाईलमध्ये काही चॅटिंग वाचली. तिने पतीची समजूत घालून दोन्ही मुले आणि संसाराचा विचार करून त्या मुलीपासून दूर राहण्याची विनंती केली. काही दिवस शांत राहिल्यानंतर लोचन चलबिचल झाला. प्रेयसीनेही त्याला साथ देण्याचे ठरविले. त्यामुळे दोघांनी पुन्हा मने जुळली. त्यामुळे पत्नी घरी वाद घालायला लागली. शेवटी लोचन हा प्रेयसीकडे झुकला.

हेही वाचा: थुंकणाऱ्यास हटकल्यामुळे वृद्धाचा खून

घरातील वातावरण बिघडल्यामुळे बुधवारी सकाळी पतीसोबत वाद झाला. रागाच्या भरता अमृताने थेट घरातील सिलिंग फॅनला गळफास लावून आत्महत्या केली. बाहेर गेलेला पती घरी येताच त्याला पत्नी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. प्रेमप्रकरणामुळे पत्नीची जीव गेल्याची खंत त्यालाही झाली. या प्रकरणी इमामवाडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

loading image
go to top