वसतीगृहे पुन्हा बंद होणार काय?

ऑमिक्रॉनमुळे विद्यार्थ्याची चिंता वाढली : महापालिकेकडून फेरविचार
ऑमिक्रॉन
ऑमिक्रॉनsakal
Updated on

नागपूर : कोरोना संक्रमणाचा धोका ओळखून वसतीगृहे रिकामी करण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. त्यामुळे नागपुरातील विद्यापीठांची, महाविद्यालयांची व समाजकल्याण विभागाची वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी भाड्याच्या घर शोधले होते. बरेचशे विद्यार्थी त्यांच्या गावाकडे परत गेले होते. सुमारे दीड वर्षांनंतर महाविद्यालये सुरू झाल्यावर वसतीगृहे सुरू होत आहेत. मात्र, ऑमिक्रॉनच्या भीतीमुळे पुन्हा एकदा ही वसतिगृह बंद होणार का? अस प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. राज्यात समाजकल्याणसह इतर विभागाची वसतीगृहे जेमतेम सुरू झाली आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची रिकामी करण्यात आलेली वसतिगृहे अद्याप सुरू करण्यात आली नाहीत. यामुळे विद्यापीठाच्या विभागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.

मात्र, ती वसतिगृहे सुरू करण्याचा विचार विद्यापीठाद्वारे करण्यात आला होता. त्याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चाही करण्यात आली होती. मात्र, आता राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे विद्यापीठातील नवीन प्रशासकीय कार्यालयातील वरील तिन्ही माळे महापालिकेने ताब्यात घेतले. त्यामुळे आता लवकरच वसतीगृहेही पुन्हा

शिक्षणावर लक्ष केंद्रित कसे करणार

वसतीगृहात प्रवेशीत विद्यार्थी हे बाहेर गावातील आहे. ते शिक्षणासाठी शहरात आले. ही मुले गरीब घरची असल्याने त्यांना शहरात भाड्याने खोली करून राहणे परवडण्यासारखे नाही. जी मुले खासगी खोली करून शिक्षण घेत आहेत त्यातील बहुतांश विद्यार्थी पार्ट टाइम नोकरी करतात. तर वसतीगृहात त्यांनी कमी दरात राहता येत असल्याने ते शिक्षणावर लक्ष केंद्रित करू शकतात, मात्र नव्या विषाणूच्या सावटाखाली वसतीगृहे कधी बंद होतील याचा नेम नसल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com