

नागपूर ः कोरोनामुळे (Corona updates) अनेकांची जीव गेला. रुग्णसंख्या जास्त असल्याने मनुष्यबळ कमी पडले. मनुष्यबळही प्रशिक्षित नसल्याने अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे कोरोनाच्या नियंत्रणसाठी (Corona control in Nagpur) युवक युवतींना आरोग्य क्षेत्रातील (Health department) प्रशिक्षण देण्यात येणार आहे. १ जूनपासून यांच्या नोंदणीची सुरवात होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पत्रपरिषदेत दिली. (will make skilled health workers for corona control said Nagpur Collector)
वैद्यकीय क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची सध्या वाणवा आहे. कोविडमध्ये डॉक्टरांसोबतच नर्सेस, परिचारिका, तसेच पॅरामेडिकल स्टाफची गरज मोठया प्रमाणावर आहे. ती गरज पूर्ण करण्यासाठी व तिसऱ्या लाटेत प्रशिक्षित मनुष्यबळाच्या पूर्ततेसाठी हे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. १ जूनपासून प्रशिक्षण सूरू होणार असून ‘महास्वयम’ अॅपद्वारे रुग्णालयांना कोर्सनिहाय प्रशिक्षणासाठी नोंदणी करता येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
विशेष म्हणजे अगदी ५ उमेदवारांसाठी सुद्धा प्रशिक्षण देता येईल. राज्य कौशल्य सोसायटी नोडल असणाऱ्या या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ५५ अभ्यासक्रम निश्चित करण्यात आले आहे. तर केंद्रातर्फे ५ अभ्यासक्रम निश्चित करण्यात आले. १०० ते १००० तासाचे प्रशिक्षण अभ्यासक्रमनिहाय उमेदवारांना देण्यात येईल. यासाठी उमेदवाराचे वय १५ ते ४५ दरम्यान असावे, तसेच सर्व उमेदवारांसाठी प्रशिक्षण निःशुल्क आहे. रुग्णालयांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाइटवर असेल.
हेल्थकेअर,मेडिकल,नर्सिंग, वाहनचालक, रुग्णवाहिका चालक या अभ्यासक्रमाचाही यात समावेश राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालये व २० बेडपेक्षा अधिक सुविधा असलेल्या खासगी रुग्णालय व वैद्यकीय संस्थांना व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांना ग्रीन चॅनेल म्हणून सूचीबद्ध करण्यात येणार आहे. त्यांच्या आवश्यकतेनुसार हे खासगी रुग्णालय तरुणांना प्रशिक्षित करतील, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थांना विद्यावेतनही देण्यात येणार असल्याचे कौशल्य विकास विभागाचे सहायक संचालक प्रभाकर हरडे यांनी सांगितले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर विदर्भ हॉस्पिटल असोशिएनचे सचिव डॉ.अनुप मरार, आयएमएचे अध्यक्ष डॉ.संजय देवतळे उपस्थित होते.
मधुमेहाच्या रुग्णांवर विशेष लक्ष
पोस्ट कोविड काळात म्युकरमायकोसीस होण्याचा धोका आहे. ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या मुत्राचे नमुने घेऊन मधुमेहाची तपासणी करण्यात येईल. यात नमुने पॉझिटिव्ह आलेल्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. ही तपासणी मोहीम लगेच सुरू करून शेतीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे जिल्हाधिकारी ठाकरे म्हणाले.
(will make skilled health workers for corona control said Nagpur Collector)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.