Winter Health Care : सांभाळा... हिवाळ्यात हृदयविकाराचा वाढतो धोका

ऋतु बदलाने सर्दी, खोकला व अंगदुखीचा होतो त्रास
winter health care heart attack causes doctor tips of healthy food and home remedy nagpur
winter health care heart attack causes doctor tips of healthy food and home remedy nagpuresakal

Nagpur News : डिसेंबर संपताना थंडीची तीव्रता वाढते. हवेतील बदलाचा परिणाम जास्तीत जास्त प्रमाणात त्वचेवर व केसांवर होतो. या दिवसात हार्ट अटॅकचा धोका असतो. त्यापासून वाचण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैली अंगिकारावी असे तज्ज्ञांचे मत आहे.

दोन आठवड्यांपासून कडाक्‍याची थंडी पडत आहे. रात्रीचे किमान तापमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले होते. अशा गार वातावरणात दमा, सांधेदुखी तर वाढतेच पण हृदयावर दबाव येऊन तो धोकादायक ठरतो. तापमानातील बदलाने पहाटेच्या समयी हृदय विकाराचा धोका वाढतो. तसेच सकाळी गारठा, दुपारी ऊन, यामुळे ताप, खोकला, अंगदुखीसारखे आजारही बळावतात.

तसेच विषम तापमानाचा त्वचेसह हृदयावरही विपरित परिणाम होतो. वैद्यकशास्त्रात हिवाळा हा हेल्दी सीझन समजला जातो. परंतु पारा खाली वर होत असला की, आजार डोके वर काढतात. त्यामुळे या काळात वृद्धमंडळी व बालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

वारंवार हवामानात बदल होत असल्याने रोग प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना हृदयविकाराचा धोका जात असतो, तर पहाटे लवकर उठणाऱ्यांना सर्दीचा अधिक त्रास जाणवतो. या वातावरणामुळे वृद्ध, गर्भवती, लहान मुले थंडीमुळे उद्‌भवणाऱ्या आजारांना बळी पडत असल्याचे दिसत आहे.

हिवाळ्यात हे लक्षात ठेवा

  • दररोज गरम पाण्याची वाफ घ्यावी.

  • हिवाळ्यात नियमित चालण्याचा व्यायाम करावा.

  • संपूर्ण अंग झाकेल असे उबदार कपडे वापरावे.

  • अति मद्यपानाने हृदयाचे ठोके वाढतात. यामुळे जास्त मद्यमान करू नका.

  • सिगारेट ओढल्याने शरीरात हाय डेन्सिटी कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. यामुळे धोका वाढतो

  • हिवाळ्यात रक्तवाहिन्यांमध्ये ग्लुकोज वाढते, यामुळे मधुमेह असेल तर नियंत्रणात ठेवावा.

  • रक्तदाबाचा शरीरावर, हृदयावर प्रभाव पडतो. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहील यासाठी प्रयत्न करावा.

  • आहारात स्निग्ध पदार्थाचे सेवन वाढवावे.

या कारणाने येतो अटॅक

हिवाळ्यात शरीराचे तापमान बदलते. हृदयाला शरीराचे योग्य तापमान राखण्यास जास्त मेहनत करावी लागते. त्यामुळे हृदयावर जास्त दबाव येतो. अशावेळी हृदय कमजोर असलेल्यांना हार्ट फेल्युअरचा धोका वाढतो. कॅटेकोलामाईन रक्तवाहिन्यांना आकुंचित करते, ज्यामुळे हृदयगती, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढतो. संशोधनानुसार उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात चार ते पाच टक्के हृदयविकाराचा धोका अधिक आहे, असे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. आनंद संचेती म्हणाले.

मधुमेह, रक्तदाब असणारे व्यक्ती, लठ्ठ व्यक्ती सोबतच धुम्रपान व अतिमद्यपान करणाऱ्यांना हृदयविकाराचा धोका असतोच, मात्र हिवाळ्यात हा धोका चार पटींनी वाढतो. अशा वातावरणात जड आहार घेतल्यानंतर शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी-जास्त होते. हृदयात आलेले अवरोध फुटतात आणि हृदयविकाराचा धोका संभवतो.

-डॉ. आनंद संचेती, हृदयरोग तज्ज्ञ, नागपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com