Winter Session 2023 : पहिल्याच दिवशी खडाजंगी; अंबादास दानवेंच्या टीकेला फडणवीसांचे उत्तर

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन गुरुवारपासून नागपुरात सुरू झाले.
winter session 2023 first day devendra fadnavis reply to ambadas danve nawab malik entry politics
winter session 2023 first day devendra fadnavis reply to ambadas danve nawab malik entry politicsesakal

Nagpur News: विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन गुरुवारपासून नागपुरात सुरू झाले. थंडीच्या मोसमात पावसाळी वातावरण असताना अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी झाली अन् विधान परिषदेतील वातावरण चांगलेच तापले.

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पहिल्याच दिवशी सभागृहात केलेली एन्ट्री वादग्रस्त ठरली. नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बाकावर बसण्याचा मुद्दा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते यांनी परिषदेत छेडला आणि सत्ताधाऱ्यांकडून ओरड सुरू झाली.

नेहमीप्रमाणे हात उंचावून थांबवत गरम झालेल्या वातावरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, हो मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मांडीला मांडी लावून बसलो आहे. शेजारी अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसलो.

त्यांच्या बाजूला छगन भुजबळ देखील आहेत. मात्र ज्यावेळी ‘त्या’ मंत्र्यांवर देशद्रोहाचा खटला होता, ते जेलमध्ये होते, त्यावेळी त्यांचा राजीनामा घेणार नाही, ही तुमच्या सरकारची भूमिका होती, त्याचे उत्तर द्यावे लागणार आहे...यानंतर वातावरण अधिक तापण्यापुर्वीच उप सभापती नीलम गोऱ्हे यांनी मध्यस्थी करीत वातावरण शांत केले.

शेड नेट साठी विशेष योजना तयार करणार; फडणवीस

शेडनेटचे नुकसान झाले आहे, हे सत्य आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना शेडनेट उभारण्यासंदर्भात विशेष योजना तयार करण्यासंदर्भात चर्चा झाली. शेड नेटची किंमत जास्त असल्याने यासाठी स्वतंत्रपणे शेडनेट विमा योजना तयार करता येईल, काय? यासंदर्भातही निर्देश दिले आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधान परिषदेत सांगितले.

winter session 2023 first day devendra fadnavis reply to ambadas danve nawab malik entry politics
Nagpur News : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी २२ जिल्ह्यात अवकाळी पावसाने साडेचार हेक्टरीचे नुकसान झाले. त्याचबरोबर वादळ वाऱ्यामुळे शेड नेटचे मोठे नुकसान झाले. शेडनेटसाठी विमा योजना नाही, पशुधनासाठी विमा योजना नसल्याचे निदर्शनास आणून दिले. याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शेड नेट विमा योजना तयार करण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com