हिवाळी अधिवेशन; जुन्या निविदाच कायम करून कंत्राटदारांना काम देण्याचा प्रस्ताव

अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ फेब्रुवारीपासून नागपूर येथे घेण्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.
हिवाळी अधिवेशन
हिवाळी अधिवेशनSakal

नागपूर : अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घेण्याचे नियोजित असल्याने प्रशासनाकडून आवश्यक तयारी सुरू करण्यात येत आहे. तरी अंतिम आदेशासाठी मुंबईकडे लक्ष लागले आहे. वेळ कमी असल्याने हिवाळी अधिवेशनसाठी काढण्यात आलेल्या निविदाच कायम करून कंत्राटदारांना काम देण्याचा प्रस्ताव बांधकाम विभागाच्या विचाराधीन असल्याची माहिती पुढे आली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ फेब्रुवारीपासून नागपूर येथे घेण्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. विधिमंडळ सचिवालयाने १६ फेब्रुवारीपासून सचिवालयाचे कामकाज नागपूर येथे सुरू करण्याबाबतचे परिपत्रकही काढले. विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांनी पहिल्या टप्प्यात कामकाजाचा आढावाही घेतला. परंतु अद्याप शासनाकडून स्पष्ट निर्देश आले नाही. वेळ कमी असल्याने प्रशासनाकडून आवश्यक तयार सुरू करण्यात आली आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने कामे करण्यासाठी बांधकाम विभगाकडून मागील वर्षी ५० कोटींच्या निविदा काढून अंतिम करण्यात आल्या होत्‍या. परंतु अधिवेशन रद्द झाल्याने कंत्राटदारांना काम देण्यात आले नव्हते. अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी त्याच निविदा कायम करण्यासाठी बांधकाम विभागाकडून तशी फाइलही तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. परंतु अद्याप अधिवेशन सुरू होण्याबाबत शासनाकडून कोणत्याही स्पष्ट सूचना नाही. त्यामुळे कार्यादेश दिल्यानंतर अधिवेशन रद्द झाल्यास बिलाचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे परंतु अंतिम मंजुरीसाठी प्रशासनाच मुंबईकडे लक्ष लागले.

आमदार निवास मुक्त

कोरोना रुग्णांना ठेवण्यासाठी आमदार निवासाला क्वारंटाइन केंद्र बनविण्यात आले. विधिमंडळ सचिवालयाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकाच्या आधारे आमदार निवास क्वारटाइन केंद्रातून मुक्त करण्यात आले. तर १६० खोल्यांचे गाळे खाली करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली. बांधकाम विभागाकडून देवगिरी, रविभवन व नागभवनाची सफाई सुरू करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com