esakal | अफलातून! एक्स रे न काढताही मिळाला कोरोना रुग्णाचा रिपोर्ट
sakal

बोलून बातमी शोधा

without x-ray corona positive patient got report

तीन दिवसांपासून येथे दाखल असलेल्या रुग्णाचा एक्सरे काढलाच नाही. मात्र डॉक्टरांच्या हाती एक्स रे पोहोचला कसा?

अफलातून! एक्स रे न काढताही मिळाला कोरोना रुग्णाचा रिपोर्ट

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : खासगीतील उपचार आवाक्यात नसल्यामुळे गरीब लोकांना मेडिकलशिवाय पर्याय नसतो. मात्र मेडिकलमधील डॉक्टरांसह साऱ्यांनी गलथानपणाचा कळस मांडला आहे. नुकतेच वॉर्ड क्रमांक ४९ मधील घटना ऐकून आश्चर्य वाटेल.

सध्या ती काय करते? 'स्वदेश' फेम गायत्री जोशीची कहाणी, वाचा...

एक्सरे न काढताच रुग्णाला एक्स रे चा रिपोर्ट रुग्णाला सांगण्यात आला असल्याचा पराक्रम केला असल्याचा अफलातून प्रकार पुढे आला आहे. तीन दिवसांपासून येथे दाखल असलेल्या रुग्णाचा एक्सरे काढलाच नाही. मात्र डॉक्टरांच्या हाती एक्स रे पोहोचला कसा? हे ऐकून चक्क रुग्णाने डोक्यावर हात मारून घेत मला सुटी द्या...मी घरी जातो, अशी विनवणी केली आहे. मात्र त्याला सोडण्यात येत नसल्याची व्यथा त्याने बोलून दाखवली. 

वा रे पठ्ठे...शाळेलाच पाठवले ऑनलाइन क्लासेसचे बिल

त्या कोरोनाबाधित रुग्णाचे नाव नितीन भारत पाटील असे आहे. कोरोनासदृश्य लक्षणे आढळून आल्यामुळे घराजवळच्या एका क्लिनिकमध्ये डॉक्टरला दाखवले. त्यांनी कोरोनाच्या चाचणीचा सल्ला दिला. ध्रुव पॅथॉलॉजीमधून आलेल्या अहवालातून नितीन कोरोनाबाधित असल्याचे पुढे आल्यामुळे घाबरला. तत्काळ राधाकृष्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी गेला. मात्र त्याला मेडिकलचा रस्ता दाखवण्यात आला. अखेर नितीन पाटील मेडिकलमध्ये आला.

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना 

कोरोना बाधित असल्याचा अहवाल दाखवताच त्याला वॉर्ड ४९ मध्ये दाखल करण्यात आले. यानंतर त्याला एक्स रे काढण्यासाठी पाठवण्यात आले. मात्र तास दोन तासांच्या प्रतीक्षेनंतरही एक्स रे काढण्यात आला नाही. यामुळे अखेर नितीन पुन्हा वॉर्ड ४९ मध्ये परत आला. यानंतर तो एक्स रे काढण्यासाठी गेला नाही. मात्र तिसऱ्या दिवशी घरी जाऊ का अशी विचारणा केली, असता, त्याच्यासमोर त्याचा एक्स रे बघितला गेला. ठणठणीत बरे असल्याचे सांगत घरी जाऊ शकता असे सांगण्यात आले. मात्र त्याला सुटी देण्यात येत नसल्याची व्यथा त्याने प्रसार माध्यमांजवळ व्यक्त केली. यासंदर्भात मेडिकल प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही. 
(संपादन : प्रशांत राॅय)

loading image
go to top