नागपूर - रॉडने वार करून एका महिलेचा खून करण्यात आल्याची घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत अखेर बुधवारी महिलेचा मृत्यू झाला. ही घटना दाभा येथे मंगळवारी रात्री १०.३० च्या सुमारास घडली. हेमलता वैद्य (३२) रा. अंकाशी सोसायटी, दाभा असे मृत महिलेचे नाव आहे. तर अक्षय दाते (२४) असे आरोपीचे नाव आहे.