OLX वरील मैत्रीने केला घात, कारमध्ये तरुणीवर बलात्कार

crime
crimee sakal

नागपूर : ओएलएक्सवरून झालेली मैत्री एका युवतीच्या इभ्रतीवर बेतली. युवकाने वाढदिवसाची पार्टी दिल्यानंतर परत येत असताना अंधारात कार थांबविली. युवतीला मारहाण करून कारमध्ये कोंबून बलात्कार केला. (nagpur crime news) याप्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला. वीर सिंग (२८, रा. प्रतापनगर) असे आरोपीचे नाव आहे. (woman physically abused in nagpur)

crime
...तर राजकारणातून संन्यास घेईल, फडणवीसांची मोठी घोषणा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २९ वर्षीय युवती रिया (काल्पनिक नाव) ही सक्करदरा परीसरात राहते. ती एका जीममध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून नोकरी करते. ती गेल्या काही महिन्यापासून चांगल्या नोकरीच्या शोधात होती. तिने ओएलएक्सवर स्वतःचा बायोडाटा अपलोड केला होता. त्यावरून तिच्या मोबाईल क्रमांकावर आरोपी वीर सिंग याचा फोन आला. त्याने नोकरीबाबत चर्चा केली. त्यानंतर त्याने चॅटिंग सुरू केली. रियाला देखील नोकरीची आवश्‍यकता असल्यामुळे ती बोलायला लागली. दोघांचेही फोनवरून बोलणे आणि नंतर भेटीगाठी सुरू झाल्या. त्यातून दोघांची मैत्री झाली. गेल्या २३ जूनला वीर सिंगचा वाढदिवस होता. त्यामुळे त्याने रियासाठी सरप्राईज पार्टी आयोजित केली. त्याने रियाला फोन करून वाढदिवसाच्या पार्टीसाठी जायचे असल्याचे सांगितले. ती तयार झाली. रात्री आठ वाजता तिला घ्यायला आला. ती सक्करदरा चौकातून त्याच्या कारमध्ये बसली. रात्री दहा वाजता वीर आणि रिया दोघेही अमरावती रोडवर असलेल्या एका हॉटेलमध्ये गेले. तेथे जेवण केल्यानंतर ते कारने परत येत होते. दरम्याने त्याने तिला ‘बर्थडे गिफ्ट’ म्हणून शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार दिला. त्यामुळे त्याने अंधारात कार उभी केली. त्यानंतर तिला मारहाण केल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. ती भेदरलेल्या अवस्थेत घरी पोहोचली. तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. तिला पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला दिला. तिने लगेच तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वीर हा मूळचा गोंदियाचा असून तो एका खासगी कंपनीत नोकरीवर आहे. गुन्हा दाखल होताच तो फरार झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com