Nagpur Crime
sakal
नागपूर - तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डागा शासकीय स्मृती स्त्री रुग्णालयातून शुक्रवारी (ता.२१) बारा वाजताच्या सुमाराल नवजात बालिकेला एका बुरखाधारी महिलेने चोरी केल्याची घटना उघडकीस आली होती. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतल्यावर तिचे ३ तारखेला जन्मलेले बाळ हे ११ ऑगस्टला मरण पावले. त्या धक्क्यामुळे ती नवजात बालिकेच्या शोधात तब्बल नऊ दिवस मेयोसह डागा रुग्णालयात फिरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.