‘उज्वला’च्या हाताला महागाईचे चटके; चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ

‘उज्वला’च्या हाताला महागाईचे चटके; चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ

चांपा (जि. नागपूर) : दारिद्रय रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांनाही स्वयंपाकाचा गॅस (Gas Cylinder Rates) मिळावा, तसेच जंगलतोडी व चुलीमुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे, या उदात्त हेतूने केंद्र सरकारने उज्वला योजनेंतर्गत (Ujwala Scheme) गॅसचे वितरण केले. मात्र, गत काही महिन्यात गॅसचे भाव गगनाला भिडल्याने तसेच सबसीडीही (Cylinder Subsidy) जवळपास बंदच झाल्याने उज्वला योजनेचे ग्रामीण भागातील लाभार्थी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करीत असल्याचे चित्र सर्वत्र पाहवयास मिळतात. (women can not buy cylinders as rates are high)

‘उज्वला’च्या हाताला महागाईचे चटके; चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
मार्डच्या डॉक्टरांनी दिला ICUमधील रुग्णसेवा थांबवण्याचा इशारा

उज्ज्वला योजनेंतर्गत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गॅस सिलिंडर्सचे वितरण करण्यात आले. मात्र त्यानंतर गॅस सिलिंडर्सचे दर गगनाला गेल्याने धूरमुक्तीची घोषणा हवेत विरली आहे. स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रत्येक महिन्यालाच वाढत असून यामुळे सर्वांचेच 'बजेट’ कोलमडत आहे. यात पगारदार, व्यावसायिकही चिंतेत असताना गोरगरीब व अल्प उत्पन्न असणाऱ्यांसमोर तर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

आवाक्याबाहेर गॅस सिलिंडरचे दर

उज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शन मोफत मिळाले. काही महिने सबसीडीही मिळाली. आता दरवाढ झाल्यानंतर सबसीडी मिळत नसल्याचे चित्र आहे. जानेवारी २०२१ मध्ये हे दर ६९९.५० रुपयांवर पोहचले. त्यानंतर या महिन्यात पुन्हा भाववाढ होऊन फेब्रुवारी २०२१मध्ये सिलिंडरचे दर ७८९, ५० नंतर मे व जून २०२१ महिन्यात ८६०, ते ९०० रुपयांवर पोहचले आहेत.

‘उज्वला’च्या हाताला महागाईचे चटके; चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
कचऱ्यातून महापालिकेला मिळणार तब्बल ५ कोटी; ई-कचरा येणार कामी
दरररोज वाढत जाणारी महागाई चिंतेची ठरत आहे. घरातील खर्च भागवितांना नाकीनऊ येत आहे. त्यात आता सिलिंडरचे दरही वाढत असल्याने गॅस वापरणे शक्य नसल्याने चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे.
-शिल्पा कृष्णा इरपाते, गृहिणी

(women can not buy cylinders as rates are high)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com