सैनिक पती ड्युटीवर जाताच पत्नीची आत्महत्या; मोबाईलवरील चॅटिंगने घेतला जीव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

women committed suicide

सैनिक पती ड्युटीवर जाताच पत्नीची आत्महत्या; चॅटिंगने घेतला जीव

नागपूर : सैनिक पती ड्युटीवर जाताच विरहात पत्नीने गळफास लावून आत्महत्या (women committed suicide) केली. ही दुर्दैवी घटना सीआरपीएफ कॅम्प शिवनगाव येथे उघडकीस आली. पूनम राजकुमार डगवार (३१) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार डगवार हे सीआरपीएफमध्ये झारखंड राज्यात कर्तव्यावर आहेत. त्यामुळे पत्नी पूनम ही दोन मुलांसह शिवनगावातील सीआरपीएफ क्वॉर्टरमध्ये राहत होती. पती राजकुमार हे गेल्या आठवड्यात सुटीवर नागपुरात आले होते. त्यांनी पत्नी आणि मुलांसह सासुरवाडीत मुक्काम केला. राजकुमार दोन दिवसांपूर्वी झारखंडला ड्युटीवर निघून गेले.

हेही वाचा: ३१ डिसेंबरपासून आठवीपर्यंतच्या शाळा बंद; हिवाळी सुट्ट्या जाहीर

तेव्हापासून पूनम तणावात होती. बुधवारी ती दोन्ही मुलांना घेऊन क्वॉर्टरवर निघून गेली. मात्र, माहेरच्यांना तिच्या वागण्यावर शंका आल्याने ते तिच्या मागेच घरी पोहोचले. परंतु, पूनमने दुपारी अडीच वाजता घरात सिलिंग फॅनला गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास पोलिस करीत आहे.

मोबाईलवरील चॅटिंगने घेतला जीव

काही दिवसांपासून पूनम ही कुणाशीतरी मोबाईलवर चॅटिंग करीत होती. त्यामुळे तिला पतीने (Disputes over mobile chatting) हटकले. तिच्या आई-वडिलांनीही तिला मोबाईलवर चॅटिंग न करण्याबाबत सुनावले होते. अपमानीत झाल्यासारखे वाटल्यामुळे पूनमने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती (women committed suicide) सोनेगाव पोलिसांनी दिली.

Web Title: Women Committed Suicide Disputes Over Mobile Chatting Family Dispute Crime News Nagpur District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top