ग्रामीण भागातील महिलांचा गृहसजावटीवर भर; आरोग्यवर्धक रोपट्यांना महत्व

ग्रामीण भागातील महिलांचा गृहसजावटीवर भर;  आरोग्यवर्धक रोपट्यांना महत्व

सावनेर (जि. नागपूर) : कोरोनामुळे महिलांना घरी बराच वेळ मिळतो. त्यामुळे ग्रामीण भागातील (Rural area) बहुतेक महिला गृह सजावटीवर (Home Decoration) भर देत आहेत. सावनेरातील (Saoner) हिना नारेकर व चांदणी नारेकर या दोघ्या महाविद्यालयीन तरुणींनी ‘इनडोअर प्लांट’ तयार करून आकर्षक सजावट केली आहे. कोरोनामुळे आरोग्याबद्दल जागृत झाल्याने गुळवेल तुळस या आरोग्यवर्धक रोपट्यांना महत्त्व दिले जात आहे. याशिवाय फुल झाडे व इतर शोभिवंत झाडांची रोपटे लावली जातात. (Women from rural area are doing home decoration during lockdown)

ग्रामीण भागातील महिलांचा गृहसजावटीवर भर;  आरोग्यवर्धक रोपट्यांना महत्व
लक्षात ठेवा! आता २५ नव्हे तर अवघ्या १५ जणांनाच परवानगी; लग्नसमारंभांवर पुन्हा संक्रांत

सर्वांनाच हिरवाईशी मैत्री करायला आवडते. यात ग्रामीणच्या महिला व तरुणीही मागे नाहीत. घरात सौंदर्य वाढविण्यासाठी त्यांची धडपड सुरू दिसत आहे. यासाठी घराचे सौंदर्य वाढावे, यातून मन प्रसन्न व्हावे, यासाठी कुठे परसबाग लावल्या जात आहेत. तर कुठे वेगवेगळ्या रोपांचा वापर करून छोटासा प्लांट तयार करायला महत्त्व दिले जात आहे.

कोरोना काळात घरीच राहायची वेळ आल्याने वेळ घालवण्यासाठी घरातील सजावटीवर भर पडावी. यासाठी कुंड्या, मातीची भांडी टप, रिकामे पिंप, सिमेंट गोणी, बादली यांचा देखील वापर करून गुळवेल, तुळस, रंगीबेरंगी फुलझाडे, शोभिवंत झाडांची रोपटे लागवड करून जगविण्यासाठी आवश्यकतेनुसार सकाळ-संध्याकाळ पाणी देणे व नीट काळजी घेतली जात आहे.

‘इनडोअर प्लांट’

प्रत्येकाला घरी देखील हिरवाई फुलवाविशी वाटते. छोट्याशा जागेत, गच्छीवर किंवा गॅलरीत आकर्षक बाग फुलविता येते. यासाठी इच्छाशक्ती व थोडाफार वेळ काढण्याची गरज आहे. आता महिला भगिनींना घरीच राहावे लागत असल्याने गृहिणी व विशेष करून तरुणी कुणी फुलझाडे, औषधी वनस्पती तर कुणी शोभेची झाडे शोभिवंत वेल अशा झाडांची कुंड्यांमध्ये लागवड करून इंडोअर प्लांट तयार केल्याचे वैशाली निकाजू, पुनम कोहळे, चांदनी नारेकर, रेश्मा हिवसे, शिल्पा बसवार, हिना नारेकर आदी सांगतात.

ग्रामीण भागातील महिलांचा गृहसजावटीवर भर;  आरोग्यवर्धक रोपट्यांना महत्व
...तर आरोग्य केंद्र बंद पाडू; ऑनलाइन लसीकरण पद्धतीविरोधात तरुणाईचा संताप
मला सुरुवातीपासूनच रोपटे लावायची आवड आहे. आता घरी बराच वेळ मिळतो. त्यामुळे मी याकडे अधिक लक्ष देत आहे. यामुळे माझा वीरुंगळा होतो. घरातील वातावरण शुद्ध व मन रमणीय वाटते.
-हिना नारेकर, होळी चौक सावनेर

(Women from rural area are doing home decoration during lockdown)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com