शहरातील रस्त्यांवर महिला किती सुरक्षित? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women safety issues

शहरातील रस्त्यांवर महिला किती सुरक्षित?

नागपूर : नवरात्रोत्सव देवीच्या सन्मानाचा सण. दृष्टांचे निर्दालन करून सतवृत्तीचा जागर करणाऱ्या देवीचे पूजन करण्याचा उत्सव. देवीमध्ये स्त्रीचे प्रतिबिंब आपण बघतो. उदात्त भारतीय परंपरेची तशी आपणाला शिकवणूकच आहे. परंतु देवीसम असलेली स्त्री किती सुरक्षित आहे? नागपूर शहरातील रस्त्यांवरून चालताना तिला सुरक्षित वाटते का? याबाबतचे व्यापक सर्वेक्षण ‘सकाळ’ने केले.

नागपूर शहरातील ५,१८,९४९ घरांपैकी तब्बल २,१६,८५९ घरांपर्यंत म्हणजे ४२ टक्के घरापर्यंत आम्ही पोहोचलो. ‘तुमच्या भागातील रस्त्यांवरून चालताना तुम्हाला सुरक्षित वाटते का?’ असा प्रश्न त्यांना विचारला. नागपूर शहरातील महानगरपालिकेच्या दहाही झोनमधील महिलांनी यावर भरभरून उत्तरे दिली. विविध भागातील विविध निरीक्षणे होती.

सरासरी ४२ टक्के महिलांना सुरक्षित वाटत नाही, तर २८ टक्के महिलांना अंशतः सुरक्षित वाटते. केवळ ३० टक्के महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना आहे. आश्चर्य म्हणजे यापैकी केवळ ८ टक्के महिला सुरक्षित असल्याचे ठामपणे सांगतात. ही आकडेवारी अत्यंत चिंताजनक आहे.