
Sakal's Ladies First: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘सकाळ’ने सात दिवस ‘लेडिज फर्स्ट’ आदर की अनादर’ ही मालिका चालवली. याविषयी अभिनंदन करताना पुरुषाने महिलेसाठी काही करणे (तिला सार्वजनिक वाहनात बसायला जागा देणे, तिच्यासाठी दरवाजा उघडणे) हा तिचा आदरच असतो. मी मानसशास्त्र व समाजशास्त्राचा अभ्यास केला असून मनुष्यामध्ये असलेले पशुत्व संस्कारांनी कमी करता येते. मुलांना मोठे करताना आई-वडिलांचे योगदान मोठे असते. त्यांनी मुलांना गुणवत्तापूर्ण वेळ दिला पाहिजे, अशी अपेक्षा सुप्रसिद्ध अभिनेत्री व दिग्दर्शिका क्रांती रेडकर यांनी व्यक्त केली.